खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रिडांगणावर पार पडलेल्या प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेत ७८ क्रिकेट खेळाडूनी भाग घेतला होता. या स्पर्धेत आयपीएलप्रमाणे क्रिकेट खेळाडुचा सहभाग करून सहा क्रिकेट संघ करण्यात आले.
या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात एबीडी क्रिकेट संघ विरुद्ध चव्हाटा किंग खानापूर यांच्यामध्ये खेळविण्यात आला.
प्रथम फलंदाजी एबीडी क्रिकेट संघाने करत ६५ धावा काढल्या तर चव्हाटा किंग खानापूर संघाने ४० धावावर थांबला.
यामध्ये एबीडी क्रिकेट संघ विजयी होऊन प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला
या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून जीवन (मन्सापूर) , उत्कृष्ट गोलदांज म्हणून अरविंद (मोहिशेत), मालिकावीर मारूती गावडे (हबन्नहट्टी) आदीना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी खानापूर तालुका भाजप सेक्रेटरी गजानन गावडू पाटील यांच्याहस्ते प्रथम क्रमांकाचे मानकरी एबीडी क्रिकेट संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी सदानंद मासेकर, विनायक चव्हाण, पिंटू सडेकर, मनोज महाजन आदीच्या बक्षिस वितरण केले.
या स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी किरण पाटील, जीवन, तसेच गजानन पाटील आदीनी खूप परिश्रम घेतले.
यावेळी क्रिकेट स्पर्धाच्या बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार एस. जी. मुजावर यांनी केले.
यावेळी क्रिकेट खेळाडूनी तसेच प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
Belgaum Varta Belgaum Varta