
खानापूर : गर्लगुंजी येथील कवी यल्लाप्पा रामचंद्र पालकर यांच्या पहिल्या भावांकुर काव्यसंग्रहाचे प्रकाशन गर्लगुंजी गावातील श्री कृष्ण मंदिर बाल विकास केंद्रामध्ये शुक्रवार दि. 13 मे रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

गर्लगुंजी ग्रामस्थ, एल्गार सामाजिक साहित्य परिषद बेळगाव आणि अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद बेळगाव यांच्या वतीने ज्येष्ठ कवी यल्लाप्पा पालकर त्यांचा कविता संग्रहाचे प्रकाशन शुक्रवारी श्रीकृष्ण मंदिर बालविकास केंद्र येथे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानगड मार्केटिंग सोसायटीचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात गर्लगुंजीतील सरकारी मराठी मुलींच्या शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवनने केली. प्रास्ताविक भाषणामध्ये व्ही. एन. पाटील यांनी कवी यल्लाप्पा पालकर यांच्या थोडक्यात आढावा घेतला.
आपल्या अवतीभवतीचे साहित्य पालकर यांनी भावांकुर काव्यसंग्रह उतरल्या आहेत. त्यामध्ये प्रेम कविता, भजन, भावगीत, भक्ती गीत, कृषी विषयक, बालसाहित्य व कुंभार कलेवर मिळून 74 कविता लिहिल्या आहेत. त्या कविता दर्जेदार असून खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावचे आपल्या कवितेच्या माध्यमातून सर्वतोपरी नेले आहे. अल्प शिक्षित राहुन त्यांनी तालुक्यामध्ये नाट्य दिग्दर्शन, मराठी शाळा सांस्कृतिक कार्यक्रम राबवले आहेत. त्याची दखल शिक्षण खात्याने घेऊन शिक्षक नसताना देखील आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे. हीच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे, असे ज्येष्ठ कवी, पत्रकार शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले. ते या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते या नात्याने उपस्थित होते. प्रमुख वक्ते ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक व निवृत्त प्राचार्य वाय. पी. नाईक यांनी देखील कवितेवर आपला अभिप्राय व्यक्त केला.
त्या कार्यक्रमाला गर्लगुंजी गावचे ग्रामपंचायत अध्यक्ष अनुराधा निटूरकर, उपाध्यक्ष सुरेश मेलगे, हनमंत मेलगे, सदस्य वंदना पाटील, तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील, पिकेपीएस संचालक राजू सिद्धाणी, उद्योजक श्याम पाटील, मराठा मंडळाचे निवृत्ती शिक्षक व्ही. एन. पाटील, सदानंद पाटील, खानापूर तालुका संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भैरू कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला गावातील हितचिंतक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta