खानापूर : उचवडे (ता. खानापूर) येथील महात्मा जोतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी बैलूर ग्रामपंचायत अध्यक्षा अनुसया बामणे होत्या.
प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांनी प्रास्ताविक करताना वाचनालय स्थापन करण्यामागचा उद्देश सांगितला. बैलूर कृषीपत्तीन बँकेचे माजी अध्यक्ष मंगेश गुरव व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. बाबुराव पाटील यांनी सरस्वती प्रतिमेचे पूजन केले. शाहू पाटील यांनी फीत सोडून सभासदांच्या नोंदणीबुकाचे उद्घाटन केले तर मंगेश गुरव यांनी फीत कापून वाचनालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी विनायक तेली यांनी वाचनाचे महत्व सांगून नव्या पिढीने वाचनाकडे वळण्याची गरज आहे, असे सांगितले.
गोविंद पाटील यांचेही भाषण झाले. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष दशरथ पाटील, खजिनदार सुरेश पाटील, विठ्ठल पाटील, शटुप्पा एसकोंडे, अर्जुन नाईक, सुभाष पाटील, हणमंत पाटील, रामा पाटील, यल्लुका बामणे, वर्षा हसनेकर, शिवाजी बोंजुर्डेकर आदी उपस्थित होते. महादेव खोत यांनी सूत्रसंचालन तर कल्लापा बोंजुर्डेकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta