बेळगाव : क्षत्रिय मराठा परिषद खानापूर तालुका यांच्यातर्फे उद्या गुरुवार दि. 19 मे रोजी सकाळी 11 वाजता अ. भा. क्षत्रिय मराठा समाजाचे धर्मगुरू प.पू. श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांचा गुरुवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पाटील गार्डन करंबळ क्रास खानापूर येथे सदर गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमापूर्वी उद्या गुरुवारी सकाळी 10 वाजता जांबोटी क्रॉस येथील जगद्गुरु श्री बसवेश्वर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाजाचे स्फुर्तीस्थान छ. शिवाजी महाराज यांच्या मूर्तींना स्वामीजी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत.
खानापूर तालुक्यासह जिल्ह्यातील क्षत्रिय मराठा समाजाच्या बंधू-भगिनींनी उद्या गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या प.पूज्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या गुरुवंदना कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे आवाहन खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta