खानापूर (प्रतिनिधी) : भारत हा कृषी प्रदान देश आहे.
कृषी खात्याच्यावतीने अनेक योजना शेतकरी वर्गाला मिळत आहेत.
खानापूर तालुक्यातील मन्सापूरचे ग्रा. पं. सदस्य रिचर्ड मिनिजीस यांनी मन्सापूर येथील सर्वे नंबर ८४/ ४ शेतात कृषी होडा योजना राबवून शेतकरी वर्गाला एक आदर्श दाखवला आहे.
त्यांनी आपल्या शेतात कृषी खात्याच्यावतीने ७० फूट लांब व ७० फूट रूंध्द तसेच १७ फूट खोल असा कृषी होडा तयार केला. या कृषी होंड्याला १लाख १२ हजार रूपये खर्च आला आहे.
सध्या त्यांना कृषी खात्याकडून ७३ हजार २५० रूपये सबसीडीच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळाली आहे.
या कृषी होड्यापासून त्याना मच्छिपालन व्यवसाय करायचा आहे.
यासाठी विविध जातीच्या माशाची पिले या कृषी होड्यात सोडून त्याचे पालन करणार आहे. येत्या नऊ महिण्यात त्याची परत विक्री करता येणार आहे.
याशिवाय कृषी होड्याच्या पाण्यापासून ऊस लागवडीसाठी पाणी उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर मिरची व इतर पिके ही घेणार आहेत. या कृषी होंड्याच्या योजनेसाठी खानापूर तालुका कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यांना भरघोस मार्गदर्शन केले आहे. तसेच कृषी खात्याचे अधिकारी श्री. राठोड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
यावेळी बोलताना ग्राम पंचायत सदस्य रिचर्ड मिनिजीस म्हणाले की, शेतकरी वर्गाला कृषी होंडा हा लाभदायक व्यवसाय आहे. शेतीबरोबरच मच्छिपालन व्यवसाय ही होऊ शकतो. तेव्हा शेतकरी वर्गाने याचा लाभ करून घ्यावा, असे आवाहन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta