खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील करंजाळ गावाला जाणाऱ्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे.
याची दखल घेऊन खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी नुकताच रस्त्याची पाहणी केली.
गेल्या १८ वर्षापूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यावेळी वनखात्याने अक्षेप घेऊन काम करण्यास विरोध केला होता. परंतु स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नाने हा रस्ता करण्यात आला.
मात्र १८ वर्षाच्या कालानंतर या रस्त्याची डागडुजी सार्वजनिक बांधकाम खात्याने कधी केली नाही. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. नुकताच झालेल्या पावसाने तर रस्त्याची साफ दुरावस्था करून सोडली आहे. त्यामुळे करंजाळ, शिंदेवाडी, भालके खुर्द, आदी गावच्या नागरिकांना तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण बनले आहे. यासाठी खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी रस्त्याची पाहणी करून संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या कामाबदल नाराजी व्यक्त करून या रस्त्याबद्दल जाब विचार असल्याचे सांगितले.
यावेळी खानापूर तालुका विकास आघाडी अध्यक्ष भरमाणी पाटील, माजी ग्राम पंचायत सदस्य मष्णू पाटील, राजू पाटील, अनिल परब, शाम परब, राहूल मळीक, बाबूराव पाटील, संतोष पाटील, निलेश मादार, अशोक पाटील तसेच गावचे नागरिक उपस्थित होते.
