खानापूर : खानापूर तालुका घटक समिती अध्यक्ष देवाप्पा गुरव यांनी तब्येतीच्या कारणास्तव संघटनेचे सचिव गोपाळ देसाई यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे त्या राजीनाम्याची एक प्रत गोपाळ देसाई यांनी मध्यवर्तीकडे दिली असता मध्यवर्ती राजीनामा मंजूर करणे किंवा अध्यक्ष निवड करण्याबाबत हस्तक्षेप करणार नाही. या सर्व बाबींवर त्या-त्या घटक समितीने निर्णय घ्यावा, अशी सूचना मध्यवर्तीने केली आहे.
खानापूर समितीच्या विविध मुद्द्यावर आज बैठकीत चर्चा झाली असून चर्चेअंती खानापूर समितीने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा आणि दुसरा अध्यक्ष नेमावा अशी सूचनाही मध्यवर्तीने खानापूर समितीला केली आहे.
27 जुन रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चासंबंधी जनजागृती करण्यासाठी खानापूर समितीने आपल्यापरीने जनजागृती करावी असे आवाहन करण्यात आले. त्यावेळी सामुहिक पत्रक काढून जनजागृती करण्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आली.
मध्यवर्तीच्या सदस्यांनी खानापूर समितीच्या सदस्यांना कानपिचक्या देत खानापुरात सक्रिय राहण्याचा आणि कार्य करण्याचा आदेश दिला. सदर बैठकीला खानापूरचे अनेक सदस्य उपस्थित होते.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …