ढोकेगाळी (ता. खानापूर) : येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेची इमारत पावसामुळे कोसळली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. ढोकेगाळी मराठी शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग चालतात मात्र शाळेची इमारत मात्र तीनच खोल्यांची आहे. ती देखील मोडकळीस आलेली आणि छत देखील मोडकळीस आलेले. त्यातील एका खोलीची भिंत पावसामुळे कोसळली आहे तर दुसऱ्या खोलीचे छत मोडकळीस आले आहे तर एका खोलीत मुख्याध्यापकांचे कार्यालय आहे. अश्या परिस्थितीत पहिली ते पाचवी पर्यंत चे वर्ग चालवायचे कसे असा प्रश्न शिक्षकांसह एसडीएमसी तसेच पालक वर्गाला पडला आहे. सध्या पहिली ते पाचवी पर्यंत चे वर्ग बसविणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात मुलांना झाडाखाली बसविणे शक्य नाही. गावातील घराच्या व्हरांड्यात शाळेचे वर्ग चालू शकत नाहीत की गावाच्या समुदाय भवनात संपूर्ण शाळा चालविणे अशक्य आहे.
तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी आणि शिक्षण खात्याने वेळीच दखल घेऊन लवकरात लवकर शाळेसाठी खोल्या मंजूर करून घ्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta