
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 27 जून रोजी मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चा संबंधित जनजागृतीची सुरुवात कसबा नंदगड येथून झाली. मोर्चा संबंधित जनजागृती करण्याची बैठक समितीचे ज्येष्ठ नेते पी. एच. पाटील यांच्या घरी आयोजित करण्यात आली होती पण कसबा नंदगड गावच्या नागरिकांच्या आग्रहाने कार्यक्रम मंडपामध्ये घेण्यात आला. यावेळी गावच्या वतीने समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई व युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांचा गावच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर धनंजय पाटील, सुरेश देसाई, राजाराम देसाई, अध्यक्ष गोपाळ देसाई, राजू पाटील यांनी मोर्चा संबंधी माहिती देऊन कसबा नंदगड गावातील नागरिकांना मोर्चामध्ये बहुसंख्येने हजर राहण्याचे आवाहन केले. यावेळी पी. एच. पाटील यांनी कसबा नंदगड गावातील नागरिक कायम समितीच्या पाठीशी राहिले आहेत. समितीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये हिरारीने भाग सुद्धा घेतला आहे. बऱ्याच ज्येष्ठ मंडळींनी तुरुंगवास भोगलेला आहे, या सर्वांची माहिती देऊन मोर्चाला बहुसंख्येने उपस्थित राहुन मोर्चा यशस्वी करण्याचा पाठिंबा दर्शविला.
Belgaum Varta Belgaum Varta