खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यातील काँग्रेस, भाजप, धजद या तिन्ही ही राष्ट्रीय पक्षाना वैतागली आहे. केवळ निवडणूक पैशाचा वापर करून निवडणूकी निवडून यायचे. मात्र जनतेच्या समस्याकडे दुर्लक्ष करायचे. अशाना आता घरचा रस्ता दाखवण्यासाठी आम आदमी पक्षाने पुढाकार घेतला आहे. तेव्हा खानापूर तालुक्यातील ग्राम पंचायतीपासून तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने लागा. विविध पातळीवर संघटना तयार करून आम आदमी पक्षाचे उमेदवार निवडून आणा, असे आवाहन आम आदमी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष व निवृत्त आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी खानापूर येथील शिवस्मारक सभागृहात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केले.
यावेळी व्यासपिठावर बेळगाव, बागलकोट जिल्हा प्रमुख, राजू टोपन्नावर, विजय शास्त्रीमठ, शंकर हेगडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी खानापूर तालुका आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी प्रास्ताविक करून पक्षाच्या कामाबद्दल माहिती दिली. यावेळी ६ जिल्हा पंचायत, २० तालुका पंचायत, ५१ ग्राम पंचायत क्षेत्रात आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देऊन कार्यकर्त्यांची संख्या वाढवून निवडणूकीत जागृती करणार असल्याचे सांगितले.
बैठकीला तालुका अध्यक्ष भैरू पाटील, शिवाजी गुंजीकर, गोपाळ गुरव, सहदेव पाटील, रवीराज मुतगेकर, महादेव कवळेकर, सागर देसाई, निलावडे ग्राम पंचायत सदस्य रमेश कैंदलकर, लक्ष्मण शेंदाळे आदी आम आदमीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिवाजी गुंजीकर यांनी मानले.
