Tuesday , June 18 2024
Breaking News

कदंबा फौंडेशनकडून खानापूरात बेवारस जखमीची दखल

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर कदंब फौंडेशनच्यावतीने शहरातील होसमनी पेट्रोल पंपावर जखमी अवस्थेत बेवारस व्यक्ती गेल्या काही दिवसांपासुन विव्हळत पडली होती. पायाला जखम होऊन किडे पडले होते. याची दखल घेण्यात आली.
याची माहिती कदंबा फौंडेशनचे अध्यक्ष जाॅर्डन गोन्सालवीस यांना देण्यात आली. लागलीच कदंबा फौंडेशनचे अध्यक्ष जाॅर्डन गोन्सालवीस, उपाध्यक्ष जी. एम. कुमार, पिंटू साळुंखे, किशोर कलाल, यल्लापा सुतार आदिंनी त्याची विचारपूस करून खासगी डाॅक्टरकडून उपचार केले. जखम मोठी असल्याने अम्ब्यूलन्स बोलवून पुढील उपचारासाठी बेळगावला पाठविले. सोबत एका व्यक्तीला दिवसाची मजुरी देऊन खर्चाला पैसे देऊन पाठविण्यात आले. त्यामुळे बेवारस व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
खानापूर कदंब फौंडेशनच्या कार्याबद्दल खानापूर शहरात कौतुक केले जाते आहे.

About Belgaum Varta

Check Also

चन्नेवाडी ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन

Spread the love  खानापूर : चन्नेवाडी ता.खानापूर येथील ग्रामस्थांनी क.नंदगड ग्रामपंचायतीचे विकासाधिकारी श्री. भीमाशंकर यांचेकडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *