खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-रामनगर रस्त्याच्या कामासाठी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी रास्तारोको करून रूमेवाडी क्राॅसवर चक्काजाम केला. तर लागलीच खासदार अनंतकुमार हेगडे यांनी पॅचवर्कसाठी ४ कोटी ९२ लाखाचा निधी मंजुर केला. लागलीच पॅचवर्क कामाला सुरूवात झाली. तोच गेल्या दोन- तीन दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने या महामार्गावरील खड्ड्यांनी तळ्यात रूपांतर केल्याने या महामार्गावर चुकून कधीतरीच येणार्या लोकांना या खड्ड्यांच्या खोलीचा व त्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने लहान वाहने खड्ड्यांमध्ये अडकत आहेत.
तालुक्यातील सर्वच नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. पण काही कोणीच करत नाहीत.
हे सर्व पाहून आज गुंजी गावातील युवा कार्यकर्ते नारायण बिर्जे व पंकज कुट्रे यांनी गुंजी ते माणिकवाडीपर्यंत महामार्गावरील खड्ड्यांतील पाणी काढले. पाणी काढल्याने खड्डा कीती खोल आहे ते समजेल आणि वाहणे जाण्या-येण्यासाठी तात्पुरती का होईना पण सोईस्कर होईल. यासाठी गुंजीतील युवा कार्यकर्ते पंकज कुट्रे, नारायण बिर्जे, संतोष पाटील, संदीप पवार, पुंडलीक गोरल, गुरव, शंकर गावडा (माणिकवाडी) यांनी हातभार लावला. त्यामुळे वाहनधारकांना थोडासा दिलासा मिळाला.
Check Also
ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथील माजी विद्यार्थिनींचा लवकरच भव्य मेळावा!
Spread the love खानापूर : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद ध्यानात ठेऊन खानापूर तालुक्यातील …