Monday , April 22 2024
Breaking News

कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटक बसेस परत महाराष्ट्रात

Spread the love

तपासणी कडक : महाराष्ट्रात रुग्ण वाढलेच्या कारणाने तपासणी
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्‍या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरून मंगळवार तारीख 13 रोजी डीवायएसपी मनोजकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय अनिल कुंभार यांनी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्‍या कर्नाटक महामंडळाच्या बसेसची तपासणी केली. कर्नाटक महामंडळाची बस पुण्याहून बेळगावला जात होती. या बसमध्ये असणार्‍या प्रवाशांची आरटीपीसीआर रिपोर्ट व कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्याचा दाखला तपासणी करण्यात आला. सदर बसमध्ये एकही प्रवाशाकडे दोन्ही नसल्याने सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटक महामंडळाची बस परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात आली.
सीमा तपासणी नाक्यावर अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. या ठिकाणी ट्रक चालक व अन्य वाहनधारकांचे रॅपिड तपासणी करण्यात येत होती.
सीमा तपासणी नाक्यावर अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी भेट देऊन महाराष्ट्रातून कर्नाटकात येणार्‍या सर्व वाहनधारकांची आरटीपीसीआर रिपोर्ट व कोरोना प्रतिबंध लस घेतल्याचा दाखला पाहूनच कर्नाटकात प्रवेश द्यावा. अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
या सीमा तपासणी नाक्यावर शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग यांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने रॅपिड तपासणी करण्यात येत आहे. रॅपिड तपासणीमध्ये निगेटिव्ह असणार्‍या लोकांना कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.
यावेळी डीवायएसपी मनोजकुमार नाईक, मंडल पोलीस निरीक्षक शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, पीएसआय एस. ए. टोलगी, पीएसआय विजय पाटील यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

अत्यंत साध्या पद्धतीने प्रियंका जारकीहोळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Spread the love  चिक्कोडी : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी आज चिक्कोडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *