खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथे 145 मि. मी. सर्वात जास्त पावसाची नोंद झाली असुन गेल्या दोन दिवसापासून खानापूर शहरसह तालुक्यातील विविध भागात पावसाची संततधार सुरूच आहे.
खानापूर रामनगर महामार्गावर पावसामुळे तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे खानापूर रामनगर महामार्गाची वाहतुक पूर्णता बंद झाली आहे.
तसेच तालुक्यातील विविध गावाच्या तलाव, नद्या, नाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मागील महिन्यात पावसाने दडी मारली त्यामुळे शिवारातील पिके सुकू लागली, भात लागवडीचे कामे खोळंबून होती. त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी पसरली होती. मात्र गेल्या दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावून संततधार सुरूच केली आहे. त्यामुळे पाण्याचा साठा झाला आहे. त्यामुळे भात लागवडीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. ऐनवेळी पावसाने हजेरी लावली आणि शेतकरी सुखावला.
- नदी नाल्यात पाण्याचा साठा
खानापूर तालुक्यातील नदी नाल्याना गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मलप्रभा, पांढरी नदी, हालात्री, तसेच नाले दुथडी भरून वाहात आहे
गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद
खानापूर: ५५.६ मि. मी., नागरगाळी: ४२.२ मि.मी., बिडी: २३.२ मि. मी., कक्केरी:१९.२ मि मी., असोगा:४८.२ मि.मी., गुंजी ७०.४ मि. मी., लोंढा रेल्वे: ५९ मि. मी., लोंढा पी डब्ल्यू डी ७२मि.मी., जांबोटी २२.४ मि. मी., आणि सर्वात जास्त पाऊसाची नोंद कणकुंबी येथे १४५ मि. मी., इतकी झाली आहे.