खानापूर : जांबोटी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतीवर लादलेल्या पिडिओच्या विरोधात ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी तालुका पंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केले आहे.
जगाने दोन वर्षे कोरोनाची महामारी झेलल्यावर आत्ता तरी सरकार दप्तरी काहीतरी समस्या सुटतील या अपक्षेने सर्व ग्रामपंचायत सदस्य कार्यरत होते. पण जांबोटी पंचायतीत उदयकुमार शिवपुरी यांची बदली करून त्या ठिकाणी आजारांनी ग्रासलेल्या श्रीदेवी अंगडी यांची या ठिकाणी सहा महिन्यापूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. आठवड्यातून एक अथवा दोन दिवस त्या कार्यभार सांभाळत असायच्या पण मोजक्याच दिवसात आजारीच्या कारणामुळे त्यांनी अथणी तालुका पंचायतीमध्ये आपली बदली करून घेतली. अशा रिक्त झालेल्या जागी आपल्या खानापूर तालुक्यातून जवळपास सहा पंचायतीमधून तक्रारीचा भडीमार असणारे पंचायत विकास अधिकारी नागाप्पा बन्नी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुक्यामधून सर्व पंचायतीमधून त्यांचा विरोध करून तालुका पंचायतीमध्ये धाडलेल्या याच पिडिओना जांबोटीसारख्या पंचायतीवर नियुक्त केल्याच्या निषेधार्थ अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व ग्रामपंचायत सदस्यानी एक महिना या पिडिओच्या विरोधात पाठपुरावा करत आहेत मात्र यांची कोणीही दखल घेतली जात नाही. यामुळे खानापूर तालुका पंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केले आहे. जोपर्यंत त्या पिडिओची उचलबांगडी होत नाही तोपर्यंत आंदोलनाचा मार्ग सर्व सदस्य अध्यक्षांनी पत्करलेला आहे.
या ठिय्या आंदोलनामध्ये जांबोटी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष महेश गुरव, उपाध्यक्षा मयुरी सुतार, सदस्य सुनील देसाई, मंजुनाथ मुतगी, सुर्यकांत साबळे, अशोक सुतार, अंजना हनबर, अनुराधा सडेकर, लक्ष्मी तळवार, प्रवीणा साबळे, लक्ष्मी मादार, असे एकूण बारा सदस्यांच्या पैकी अकरा सदस्य उपस्थित आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta