खानापूर : खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रयत्नाने 35 कोटींच्या रस्त्याना मंजुरी मिळाली आहे. तर अजून 10 कोटींचे रस्ते ग्रामीण विकास खात्याकडून येत्या आठ ते दहा दिवसांत मंजूर करण्यात येणार आहेत.
यामध्ये तालुक्यासाठी 20 कोटींचे पीडब्लूडी रस्ते व 5 कोटींचे पीआरइडीचे रस्ते असे एकूण 25 कोटी कर्नाटक सरकार कडून मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये नंदगड-कसबा नंदगड-झुंजवाड डाबरीकरण 150 लाख तालुका हद्द ते हेमाडगा व शिरोली जवळील 1 किमी खराब रोड तसेच तेलगी ते कडतन बागेवाडी रोड (सिंदूर हेमाडगा रोड) 450 लाख,
नागरगाली ते करजगी क्रॉस 150 लाख, गोळ्याली स्कूल ते बकानूर रोड 100 लाख, गोळ्याली क्रॉस ते कोब्रा कॅम्प 200 लाख, गुंजी-भालके-शिंपवाडी. करंजाळ-हलसाल रास्ता 400 लाख, कपोली-शिवठाण कोडगई रोड 200 लाख, तिओली-नेरसा मेन रोड-150 लाख, याडोगा-अप्रोच रोड 100 लाख, ईदलहोंड अप्रोच रोड 100 लाख, पीडब्लूडी रोडसाठी एकूण 20 कोटी मंजूर असून येत्या महिनाभरात वरील सर्व कामांचे टेंडर निघेल व पावसाळा संपताच कामाला सुरुवात होईल.
ग्रामीण विकास मंत्रालयातून RDPR मधून 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे या रस्त्यांची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
राज्य मार्ग विकास मंडळाकडून 10 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. हलशी ते हलगा-मेराडा या रोड साठी 5 कोटी मंजूर आहेत. याचे टेंडर तयार झाले आहे. तसेच बिडी-कक्केरी-लिंगनमठ या रोडचे टेंडर देखील तयार आहेत, असे आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी सांगितले.
