बेळगाव : मराठा समाजातील यंदाच्या दहावी परीक्षेत ९० टक्के तर बारावीमध्ये ८५ टक्के गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.
मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच एका खास समारंभात या विद्यार्थांचा सत्कार होईल. तरी पात्र विद्यार्थ्यानी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स व आयडेंटिटी आकाराचा फोटो, संपूर्ण पत्ता, मोबाईल व व्हॉटसअप नंबरसह मराठा समाज सुधारणा मंडळ कार्यालय, मेलगे गल्ली, शहापूर (वेळ सकाळी ११ ते दुपारी १.३० पर्यंत), मधू कणबर्गी, शंकर बेकरीच्या बाजूला, किर्लोस्कर रोड तसेच धनश्री सोसायटी, अनगोळ रोड, अनगोळ येथे दि. 10 जुलै पर्यंत आणून द्यावे. अधिक माहितीसाठी मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील (9845960531) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
Check Also
आनंदनगर नाल्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
Spread the love बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात …