Tuesday , March 3 2026
Breaking News

नंदगड आठवडी बाजारात खानापूर तालुका म. ए. समितीकडून जनजागृती

Spread the love

खानापूर : सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठी मधून परिपत्रके मिळावीत सरकारी कार्यालय व बस वर बोर्ड मराठीमध्ये असावेत ही मागणी करण्यासाठी मध्यवर्ती समिती बेळगाव यांच्या नेतृत्वाखाली 27 जून रोजी निघणाऱ्या महामोर्चाची नंदगड गावामध्ये पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. आज बुधवार दिवशी आठवडी बाजार असल्यामुळे नंदगड परिसरातील जनता मोठ्या प्रमाणात जमली होती नंदगड बाजार पेठ मध्ये युनियन बँक समोर चावडी येथे तसेच हलशी बस स्टॉप समोर जनजागृती करणाऱ्या छोट्या छोट्या चौकसभा झाल्या. यावेळी खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी महामोर्चाचे महत्व सांगून मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभाग जनतेने दर्शवावा, असे आवाहन केले. तसेच श्री. गोपाल पाटील, श्री. पांडुरंग सावंत, निरंजन सरदेसाई, धनंजय पाटील, रणजीत पाटील आदींनी मोर्चा संदर्भात भाषणे केली व जनतेला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रस्त्यावरच्या लढाईमध्ये भाग घेऊन मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले. यावेळी नंदगड गावचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष प्रभाकर पार्शवाडकर यांनी या मोर्चामध्ये नंदगड गावा बरोबर भागातील जनता सुद्धा मोठा सहभाग दर्शवून मोर्चा यशस्वी करणार असे सांगून पाठिंबा व्यक्त केला. यावेळी दत्तू कुट्रे, राजाराम देसाई, संभाजी देसाई, मनोहर पाटील, राजू पाटील, पुंडलिक पाटील, कल्लाप्पा पाटील, इरफान मुजावर, बशीर पठाण, शिवाजी राजपूत, दिलीप पाटील, रमाकांत पाटील, तातोबा मेरवा, पुंडलिक बाळेकुंद्री आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *