खानापूर : जांबोटी गावातील सामान्य जनतेचा कानोसा घेतला असता गावातील जनतेचा पाठींबा पीडीओ नागाप्पा बन्नी यांना आहे, असे संजय गावडे यांनी सांगितले.
सध्या जांबोटी पंचायत पीडीओच्या विरूद्ध पंचायत सदस्यांनी आंदोलन छेडले आहे. परंतु गावातील सामान्य माणूस हा पीडीओच्या बाजूनी आहे, असे कॉंग्रेस कार्यकर्ते व जांबोटी भागातील प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व असलेले संजय गावडे यांनी सांगितले.
यासंदर्भात आज रात्री गावातील ग्रामस्थांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविणार आहोत,
सर्व गावकरी मंडळी पीडीओला पाठींबा देण्यासाठी आंदोलन छेडणार आहेत, असेही संजय गावडे म्हणाले.
यासंदर्भात आम्ही आमदार ताईंना निवेदन देऊन जांबोटी पंचायतला नागाप्पा बन्नी हेच पीडीओ पाहिजेत अशी लेखी मागणी करणार आहोत, असेही संजय गावडे म्हणाले.
सर्व पंचायत सदस्यांना आम्ही विनंती करतो की, बन्नी पीडीओना ४-५ महिने काम करू द्या मग त्यांच्या कामाचा लेखाजोखा करून मग पुढील निर्णय घेऊ.
याप्रसंगी दुर्गेश तळवार, दिपक साखळकर, गणेश कुलाम, राजन कुडतुरकर, दर्शन नाईक, हैदर अली नाईक, अंकुश वंजारे, दत्ता नाईक, राजू हळदणकर, निखील दालमेट, शंकर साखळकर, वगैरे सर्वजण पीडीओ बचाव मोहीम हाती घेत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta