Wednesday , March 4 2026
Breaking News

‘ऑपरेशन मदत’ व इनरव्हील क्लब बेळगांव यांच्यातर्फे कणकुंबी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना रेनकोटचे वितरण

Spread the love


खानापूर : खानापूर तालुक्यातील टोकाला असलेल्या बेळगांव जिल्ह्यातील व पश्चिम घाटातील अतिपर्जन्यमान असलेल्या खानापूर तालुक्यातील कणकुंबी गावाजवळील अतिदुर्गम खेड्यातून जंगलातील पायवाटेने माध्यमिक शिक्षणासाठी चालत येणाऱ्या कणकुंबीच्या माऊली हायस्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना पावसापासून बचावासाठी रेनकोटचे वितरण करण्यात आले.
‘ऑपरेशन मदत’ व इनरव्हील क्लब बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला गेला. या कार्यक्रमाला इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुषमा शेट्टी, सचिव डाॅ. सविता कद्दू, आयएसओ ममता जैन, श्रुतिका बागी, माजी अध्यक्षा सुनिता हणमशेट, अंजू अगरवाल, भारती उपाध्ये, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष रमेश खोरवी व शाळेचे शिक्षकगण हे मान्यवर उपस्थित होते. शाळेतर्फे गुलाब पुष्प देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत केले. सुषमा शेट्टी, डाॅ. सविता कद्दू, पद्मप्रसाद हुली यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुषमा शेट्टी यांचा शाळेतील मंत्री मंडळातर्फे शाल व गुलाब पुष्प देऊन कणकुंबी माऊली हायस्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. माऊली हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील चिगूळकर यांनी सुत्रसंचलन व प्रास्ताविक केले.
याप्रसंगी ‘ऑपरेशन मदत’ व इनरव्हील क्लबची एक आठवण म्हणून सुषमा शेट्टी, पद्मप्रसाद हुली व राहुल पाटील यांनी सर्वांच्या वतीने शाळेच्या आवारात जांभळाची रोपटी लावली. यावेळी माऊली हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळेचे विद्यार्थी व पाहुणे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *