Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूर समितीच्या वतीने २७ जूनच्या मोर्चाची गर्लगुंजी, इदलहोंड, निडगल, सिंगिनकोप भागात जनजागृती

Spread the love

खानापूर : मराठी कागदपत्रांसाठी २७ रोजी होणाऱ्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर यांच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. शनिवारी गर्लगुंजी, इदलहोंड, निडगल, सिंगिनकोप येथे मोर्च्यात सहभागी होण्यासाठी पत्रके वाटण्यात आली. खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने गर्लगुंजी, इदलहोंड, निडगल, सिंगिनकोप या भागात माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या नेतत्वाखाली जागृती दौरा आयोजित करण्यात आला. यावेळी गर्लगुंजी गावातील ज्येष्ठ नागरिक सदाशिव नारायण पाटील, बाबुराव पाटील, जयसिंह पाटील, सुभाष पाटील, अरुण पाटील, सुरेश पाटील, सदानंद पाटील, रोहन पाटील, रामचंद्र पाटील, मधू पाटील, शिवाजी हुंदरे, नामदेव गोरे, नागाप्पा कोलकर, ज्योतिबा सावंत, पुंडलीक चौगुले, चन्नप्पा मेलगे, अरुण पाखरे तर निडगल येथील विश्वास पाटील, परशराम कदम, तानाजी कदम, दिगंबर देसाई, शंकरराव पाटील तसेच इदलहोंड येथे गोविंद जाधव, बाबाजी पाटील, संदीप पाटील, संजय पाटील, सागर पाटील, हणमंत जाधव, नामदेव जाधव, भाऊराव पाटील, शामराव पाटील, यशवंत पाटील, विलास पाटील, दिनकर पाटील, परशराम पाटील, प्रकाश पाटील, शुभम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मोहन जाधव, राजाराम सावंत, संतोष पाटील, विठ्ठल जाधव, बाबाजी जाधव, अनंत जाधव त्याचप्रमाणे सिंगिनकोप येथे रमेश कुंभार, सत्याप्पा पाटील, लक्ष्मण पाटील, बसप्पा पाटील, फकीरा पाटील, दुधाप्पा कुंभार, विनायक डिचोलकर, अशोक सुतार, बळीराम कुंभार, परशराम कुंभार इत्यादींनी जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला. गर्लगुंजी येथून बाबुराव पाटील गुरुजींनी गावाच्या वतीने पाठिंबा व्यक्त केला. यावेळी माजी आमदार दिगंबरराव पाटील व आबासाहेब दळवी यांनी २७ जून रोजी होणाऱ्या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच इदलहोंड येथे गावाच्या वतीने गोविंदराव जाधव यांनी महामोर्चाला पाठींबा व्यक्त करून बहुसंख्येने सामील होण्याचे आश्वासन दिले. सिंगिनकोप येथे कृष्णा कुंभार यांनी गावाच्या वतीने महामोर्चामध्ये सामील होण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार दिगंबरराव पाटील, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, रुकमाणा झुंजवाडकर, राजू सिद्धानी, शिवाजी पाटील, अमृत पाटील, डी. एम. भोसले, कृष्णा कुंभार इत्यादी म. ए. समिती कार्यकारिणी सदस्य या दौऱ्यात सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *