खानापूर (प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या सुरूवातीलाच खानापूर रूमेवाडीजवळील करंबळ ग्राम पंचायतीच्या हद्दीतील नविन वसाहतीतील साई काॅलनीत रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
याची दखल घेऊन खानापूर तालुका आम आदमीचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्याची पाहणी केली.
यावेळी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अशा रस्त्यातुन शाळकरी लहान मुले तसेच वयोवृध्द नागरिकाना घरा बाहेर पडणे कठीण होत आहे. महिलांना ये-जा करताना चिखलातुन वाट काढत जाणे धोक्याचे झाले आहे. त्याचबरोबर पथदिप नसल्याने रात्रीच्या वेळी आंधाराचे साम्राज्य असते. अशा अनेक समस्याना साई काॅलनीतील नागरिकांना तोंड द्यावे लागते.
तेव्हा संबंधित करंबळ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्यानी व पीडीओ अधिकारी वर्गाने साई काॅलनीतील समस्या सोडवाव्या अशा मागणीचे निवेदनही देण्यात आले.
यावेळी खानापूर तालुका आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील, सचिव शिवाजी गुंजीकर, रमेश कौदलकर, बळीराम खन्नूकर, प्रभाकर पाटील, चंद्राकांत मेदार, सहदेव पाटील, रवीराज मुतगेकर तसेच साई काॅलनीतील नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta