खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी गावाला जोडणारा पाणंद रस्ता हा सर्वे नंबर १५/८ हा सरकारी पाणंद रस्ता म्हणून नोंद आहे. तेव्हा पाणंद रस्ता होणे अतिमहत्वाचे आहे. यासाठी तहसीलदार प्रविण जैन यांनी या पाणंद रस्त्याचा नकाशा करून द्यावा.
या पाणंद रस्त्यावर कोणी तरी जेसीबी लावून कामाला अडथळा आणण्याचे कामे केले जाते हे योग्य नाही. कुप्पटगिरी गावासाठी पाणंद रस्ता अतिमहत्वाचा आहे. या संदर्भात तहसीलदार प्रविण जैन, व संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाने याकडे लक्ष देऊन पाणंद रस्ता करावा, अशी मागणी बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी कुप्पटगिरी गावाच्या पंचमंडळीची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्याकडे केली आहे.
कुप्पटगिरी गावाच्या पंचमंडळीना खानापूर येथील जिल्हा पंचायतीच्या विश्रामधामात बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्याशी चर्चा केली.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, खानापूर पीकेपीएस संचालक शंकर पाटील, ग्राम पंचायत सदस्य भाऊ गंगाराम पाटील, पंच कमिटी रवळू पाटील, विठ्ठल नारायण पाटील, जोतिबा बाबाजी पाटील, यल्लाप्पा निंगापा पाटील, भाऊराव नागाप्पा पाटील, पुंडलिक तोलगेकर, संभाजी केदारील पाटील, मल्लापा पाटील आदी गावचे नागरिक उपस्थित होते.
