
खानापूर : इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे तळवडे आणि गोल्याळी गावात ‘ऑपरेशन मदत’च्या माध्यमातून पश्चिम घाटातील घनदाट वनक्षेत्रात येणाऱ्या खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील सरकारी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. तसेच नोट बुक्स लॉज व्हिक्टोरिया – 9 (ब्रदरहुड) तर्फे वितरीत केले. हे दोन्ही उपक्रम ‘ऑपरेशन मदत’ च्या टीम मेंबर्सच्या मदतीने संयुक्तपणे राबविण्यात आला. संघटनेचे कार्यकर्ते पद्मप्रसाद हुली, गौतम श्रॉफ, वृषभ कर्डीगुड्डी, पूजा अंमली आणि अभिषेक के.एच. त्यांच्या हस्ते रेनकोट व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. परंपरेप्रमाणे फळाची (जांभूळ) रोपटी लावण्यात आली व वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे राहुल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या कार्यक्रमाला रुपा चोलप्पाचे, प्रज्वल कुंदप, प्रकाश कुंदप, विकी मेहता, कार्तिक शहा, विजय बद्रा, व्हिक्टर फ्रान्सिस, भुपेंद्र पटेल, प्रशांत बिर्जे व स्थानिक नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी तळावडे सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुचित्रा शिराळकर व मनोज नायक, गोल्याळीच्या शिक्षिका आरती चौगुले, गुंडू चौगुले व तळावडे व गोल्याळी शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta