खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बरगाव पंचायतीकडून नागरिकांची कोणतीच कामे केली जात नव्हती. त्यामुळे बरगाव ग्राम पंचायत क्षेत्रातील नागरिक हैराण झाले होते. त्याचबरोबर बरगाव ग्राम पंचायत क्षेत्रातील के. पी. पाटील प्लॉटमधील नागरिकांना उतारे देण्यास टाळाटाळ होत होती. गेली अनेक वर्षे उतारा मिळण्यासाठी के. पी. पाटील यांनी सतत बरगाव ग्राम पंचायतीला भेट देऊन कागदपत्राची पुर्तता केली. मात्र के. पी. पाटील प्लॉटमधील प्लॉट धारकांना उतारे मिळाले नाहीत. इतर कामाना चालना मिळाली नाही.
यामुळे के. पी. पाटील यांनी बरगाव ग्राम पंचायतीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला. यावेळी गावातील नागरिक, प्लॉटधारकांनी के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली बरगाव ग्राम पंचायतीला मोर्चा काढून जाब विचारला.
बरगाव ग्राम पंचायतीकडून विकास कामे का होत नाही. नागरिकांना उतारे देण्यास विरोध का करता. सरकारचे सर्व प्रकारचे टॅक्स भरून कामे होत नाहीत. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांनी नागरिकांना वेठीस धरत आहेत. नागरिकांना विश्वासात न घेताच कामे केल्याचे नाटक करतात, असा आरोप यावेळी के. पी. पाटील यांनी केला आहे.
यावेळी अध्यक्षा यमुना पाटील, सदस्य उपस्थित होते. यावेळी नागरिकांना आपल्या समस्या मांडल्या. के. पी. पाटील यांनी बरगाव पंचायतीला दरवर्षी टॅक्स भरतात. परंतु कामाना मंजुरी दिली जात नाही. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून कामे खोळंबली आहेत, असे सांगितले.
ग्राम पंचायतीचे सदस्य पीडिओ मनमानी करतात. नागरिकांना विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे बरगाव ग्राम पंचायतीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला, असे के. पी. पाटील यांनी सांगितले. शेवटी पीडिओ संतोष चौगुले, अध्यक्षा यमुना पाटील सदस्यांतून तसेच नागरिकांतून चर्चा होऊन नागरिकांना उतारे देण्याचे, विकास कामे करण्याचे आश्वासन पीडिओ, अध्यक्षा सदस्यांनी दिले.
यावेळी पोलिसही उपस्थित होते. तसेच निवृत्ती पाटील भंडरगाळी, प्रताप पाटील, मल्लापा कडोलकर, प्रकाश पाटील, नंदू पाटील, आदी नागरिक उपस्थित होते.
