खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजपच्या वतीने राज्यात गेली आठ वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्कृष्ट राज्य कारभाराबद्दल यशस्वीतेचे ८ वर्ष साजरे करण्यात आले.
यानिमित्ताने खानापूर येथील शिवस्मारक चौकात रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवस्मारक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते व माजी आमदार अरविंद पाटील, भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर, तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल आदीच्याहस्ते पुष्पहार घालुन आभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रमोद कोचेरी म्हणाले की, देशात व कर्नाटक राज्यात भाजप सरकार उत्तम प्रकारे जनतेची सेवा करत आहे. हे आठवे वर्ष असुन यानिमित्ताने खानापूर शिवस्मारक चौकापासुन ते नंदगड येथील वीर संगोळी रायण्णा समाधीपर्यत बाईक रॅली काढुन जनतेला भाजप सरकारची जाणीव करून देऊ असे सांगीतले.
तर माजी आमदार अरविंद पाटील यांनी भाजप पक्ष देशासह कर्नाटक राज्यात उत्तम सरकार चालविणारा पक्ष आहे. भाजपने जनतेच्या हितासाठी अनेक योजना, सुविद्या आणल्या. त्यामुळे मोदी सरकार नावारूपाला आले.
यावेळी विठ्ठलराव हलगेकर, संजय कुबल आदिंची भाषणे झाली.
त्यानंतर बाईक रॅलीची सुरूवात झाली. या रॅलीमध्ये भाजप नेते बाबूराव देसाई, तालुका सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, राजेद्र रायका, बाबासाहेब देसाई, अशोक देसाई, गजानन पाटील, युवा नेता पंडित ओगले, जोतिबा रेमाणी, सुनिल नायक, रवी बडगेर, मल्लापा, मारीहाळ, संतोष मादार, आदी शेकडो भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta