खानापूर : खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम व अतिजंगल भागातून वाहणार्या भांडुरा नदीमुळे गवाळी, पास्टोली, कोंगळा या तीन गावचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. त्यामुळे या भागातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
या समस्या कधी सुटणार आणि गवाळी, पास्टोली, कोंगळा नागरिकांचे हाल कधी थांबणार अशी परिस्थिती झाली आहे.
नेरसा ग्राम पंचायतीच्या हद्दीतील नेरसा गावापासून 17 किलोमीटर अतंरावर गवाळी, पास्टोली, कोंगळा ही गावे घनदाट जंगलात आहेत.
पावसाळा सुरू झाला की, तीन महिने भांडुरा नदी दुथडी भरून पाणी वाहते. त्यामुळे गवाळी, पास्टोली, कोंगळा गावाना बेटाचे स्वरूप येते. त्यामुळे या तिन्ही गावातील आजारी पडलेल्या रूग्णांना नरक यातना सहन कराव्या लागतात. कोणतीच सोय नसल्याने दवाखान्याला उपचाराला नेण्यासाठी जीवंतपणी तिरडी करून भांडुरा नदी पात्रातून नेऊन तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जाण्याची वेळ येते. याभागातील शिक्षकांना गावातच राहावे लागते. रेशन मिळणे कठीण असते.
अशा परिस्थितीत भांडुरा नदीवर ब्रीज उभारणे अत्यंत गरजेचे आहे. तालुका प्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष होत आहे. तर ब्रीज उभारण्यास वनखात्याचा अडसर होत आहे. अशामुळे गवाळी, पास्टोली, कोगळा नागरिकांना आजपर्यंत पावसाळ्यात दिवस काढणे म्हणजे नरकयातनाच आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta