
खानापूर : नागरगाळीजवळ कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी झाले.
आळणावर येथील कार चालक सागर बिडीकर याचा जागीच मृत्यू झाला तर गिरीश नांदोलकर, वीरन्ना कोटरशेट्टी, रमाकांत पालकर व विठ्ठल काकडे हे गंभीर जखमी झाले आहेत.
कारमधील सर्वजण अळणावरहून गोव्याला जात होते. यावेळी कंटेनरला कारने धडक दिली. यामध्ये कारचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. खानापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह बाहेर काढून सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खानापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta