खानापूर (प्रतिनिधी) : पुण्यातील खानापूर (बेळगांव) मित्र मंडळ आयोजित वार्षिक स्नेहसोहळा शनिवार दि. २ रोजी मुक्ताई गार्डन धायरी, पुणे येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर (बेळगांव) मित्र मंडळचे अध्यक्ष पीटर डिसोझा होते.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुका माजी आमदार अरविंद पाटील, समिती कार्यकर्ते निरंजन सरदेसाई, पुणे मनपाचे विद्यमान नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण, हरीदास चरवड, विकासनाना दांगट, भाजपा युवा कार्यकर्ते सागर भुमकर, किशोर पोकळे, संदीप पोकळे, पूनम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मंडळाचे सचिव शिवाजी जळगेकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले तर खजिनदार रामचंद्र बाळेकुंद्री यांनी आर्थिक अहवाल सादर केला.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन जिव्हाळा या स्मरणिकेचे मान्यवराच्याहस्त प्रकाशन करण्यात आले. तसेच संकेतस्थळाचेही उद्घाटन करण्यात आले
त्यानंतर गुणवंत विद्यार्थी, खेळांडू, तसेच विशेष सामाजिक कार्य केलेल्या व्यक्तीचा सत्कार करण्यात आला
यावेळी माजी आमदार अरविंद पाटील तसेच प्रमुख पाहुण्यानी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे औचित्य साधुन सास्कृतीक कार्यक्रम व पैठणी साडी लकी ड्राॅ या सारखे कार्यक्रम पार पडले.
या कार्यक्रमाला मंडळाचे अनेक सभासद सहपरिवार तसेच मित्र परिवारासह उपस्थित होते. खानापूर-बेळगावहूनही अनेक मंडळी उपस्थित होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजीव वाटुपकर आणि पांडुरंग काकतकर यांनी केले तर शेवटी देमानी मष्णूचे यांनी आभारप्रदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे संचालक लक्ष्मण काकतकर, बाळासाहेब देसाई, अजित पाटील, रामचंद्र निलजकर, नारायण पाटील, भगवंत चन्नेवाडकर, बाळकृष्ण पाटील, विजय पाटील, परशुराम निलजकर, सुरेश हालगी, केशव जावळीकर, नारायण गावडे, अशोक पाटील, राजाराम शिंदे, पांडुरंग पाटील, रामू गुंडप, महेश मळीक, परशुराम चौगुले, शिवाजी गावडा, ज्ञानेश्वर गावडे, उमाजी देवकर, लक्ष्मण पेडणेकर, बसाप्पा लाड, नागेश पाटील, सुभाष वीर, अशोक वीर, विठ्ठल सावंत यांबरोबरच अनेक सभासदांनीही अथक परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta