खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर ) येथील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांहून जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका आप आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जांबोटी को- ऑप. सोसायटीचे चेअरमन विलास बेळगावकर, तसेच व्हाईस चेअरमन पुंडलिक नाकाडी, माजी सैनिक गणपत गावडे आणि जांबोटी सीआरपी रमेश गावडे, तसेच जांबोटी विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश सडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी केले.
यावेळी एप्रिलमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यापेक्षा जास्त गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार भेटवस्तू देऊन करण्यात आला.
यावेळी उपस्थित पाहुण्यानी दहावी परीक्षेचे महत्व व त्यासाठी करावा लागणारा अभ्यास याबद्दल मार्गदर्शन केले.
शेवटी मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta