खानापूर : गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक भरती करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आक्रमक झालेल्या हलशीवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी खानापूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच येत्या आठ दिवसात शिक्षक उपलब्ध करून दिल्यास दररोज गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरविण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हलशीवाडी येथिल सरकारी मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या चांगल्या प्रमाणात आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून शाळेमध्ये एकच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या वर्षी पालक व शाळा सुधारणा कमिटीने सातत्याने मागणी केल्यामुळे अतिथी शिक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. मात्र यावेळी मागणी करून देखील अतिथी शिक्षक देण्यात आलेला नाही त्यामुळे एका शिक्षकांवरच विद्यार्थ्यांना अवलंबून राहावे लागत आहे. शाळेत कार्यरत आसलेल्या शिक्षकावर सरकारी कामांचा बोजा असल्याने त्यांना विविध कामांसाठी बाहेर जावे लागते. त्या काळात विद्यार्थ्यांना शिकविणार कोण असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे हलशीवाडी ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालय ठाण मांडले.
यावेळी पालक व ग्रामस्थांनी मराठी शाळांना जाणीवपूर्वक शिक्षक दिले जात नाहीत. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना इतर शाळेत पाठवून देत असल्याने मराठी शाळांवर गंडांतर येत आहे. त्याची दखल घेऊन शाळेत तातडीने शिक्षकाची नेमणूक करावी अन्यथा आठ दिवसानंतर गट शिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरली जाणार असून खानापूर तालुक्यातील ज्या ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक प्रमाणात असताना देखील शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत त्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गट शिक्षणाधिकारी कार्यालयात बोलावून जोरदार आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी कार्यालयातील व्यवस्थापक वाघमारे यांनी गटशिक्षणाधिकारी यक्कुंडी यांच्याशी संपर्क साधून ग्रामस्थांच्या आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर येत्या आठ ते दहा दिवसात नवीन शिक्षकाची नेमणूक केली जाईल. आश्वासन दिले त्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. .
यावेळी शाळा सुधारणा कमिटीचे विनायक देसाई, अर्जुन देसाई, नारायण देसाई, मिलिंद देसाई, विठ्ठल देसाई, मल्लाप्पा देसाई सुधीर देसाई, सुरज देसाई, रमेश देसाई, नरसिंग देसाई, महाब्लेश्वर देसाई, मनोज देसाई, प्रसाद देसाई, प्रवीण देसाई, राजू देसाई, राजश्री देसाई, रामा देसाई, बळवंत देसाई, सुरेश देसाई यांच्यासह इतर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta