खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कौलापूर गाव हे गवळ्याचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात जनावरे पाळणे हा मुख्य व्यवसाय आहे.
नुकताच झालेल्या पावसामुळे कौलापूर गावच्या लोपेश्वर गल्लीत चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्षे ओलांडून गेली तरी कौलापूर गावच्या लोपेश्वर गल्लीत रस्त्याचा पता नाही. एखदाही रस्ता झाला नाही. त्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
त्यामुळे कौलापूर गावच्या नागरिकांना चिखलाशी सामना करावा लागतो. शाळेकरी मुलाना चिखलातून ये-जा करणे कठीण झाले आहे.
मात्र याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. कौलापूर गाव गवळ्याचे असल्याने जनावरांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पावसाळ्यात जनावरामुळे रस्त्यावर चिखलाची दलदल वाढली आहे. यामुळे डांसाचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांमुळे मलेरीया, डेंग्यू सारख्या रोगाची भिती नागरिकांत घर करून आहे. अशा परिस्थितीत नागरिकांत आजार बळावला तर याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांतुन विचारला जात आहे.
तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी तसेच तालुका लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष देऊन कौलापूर गावच्या रस्त्याची समस्या सोडवावी, अशी मागणी यावेळी खानापूर तालुका आम आदमीचे अध्यक्ष भैरू पाटील यांनी बोलताना केली. यावेळी कौलापूर गावच्या नागरिकांनी आपल्या समस्याचे गाऱ्हाणे मांडले.
Belgaum Varta Belgaum Varta