गर्लगुंजी (सागर पांडुचे) : गर्लगुंजी ते नंदीहळ्ळी मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी प्रचंड मोठ्या आकाराचे खड्डे पडले असून हे खड्डे चुकवून वाहने चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या रस्त्याच्या दुतर्फा शेती असल्याने एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून या रस्त्याची एखाद्या रस्ता विकास योजनेअंतर्गत नव्याने रस्ते बांधणी करून जनतेला दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. याचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा केला जाईल, अशी अपेक्षा दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta