खानापूर (वार्ता) : गेल्या काही दिवसापासून खानापूर शहराचा पाणीपुरवठा विद्युत मोटारीत बिघाड होऊन बंद पडल्यामुळे ट्रॅक्टरने पाणीपुरवठा करण्याची वेळ शहरवासीयाना आली. त्यानंतर नगरपंचायतीने दुरूस्तीचे काम हाती घेतले व पाणीपुरवठा पूर्वपदावर आला. याबाबतची हकीकत अशी की,
नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यासह शहराला पाणीच पाणी करून सोडले. त्यामुळे मलप्रभा नदीच्या पात्रात मोठ्याप्रमाणात पाण्याचा साठा झाला. त्यामुळे खानापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या विद्युत मोटारी पाण्याच्या प्रवाहात अडकल्या त्यामुळे विद्युत मोटारीत बिघाड होऊन गेले काही दिवस खानापूर शहराला पाणीपुरवठा बंद झाला. पाणी पुरवठा बंद झाल्याने ऐन पावसाळ्यात शहरवासीयाना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले. काहीना ट्रॅक्टरने पाणीपुरवठा करून घ्यावा लागला.
शेवटी नगरपंचायतीच्या प्रयत्नाने गेल्या काही दिवसांपासून विद्युत मोटारी रिपेरीचे काम युध्दपातळीवर सुरू करून नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी, नगरसेवक कलाल, प्रकाश बैलूरकर व इतर नगरसेवक, मुख्याधिकारी विवेक बन्ने अभियंते सुहास गुरव, कर्मचारी यांनी पाणीपुरवठा करण्यासाठी पराकष्ठा केली. व पाणी पुरवठा सुरळीत करण्याची तयारी केली. आता पाणी पुरवठा लवकरच सुरळीत होईलही अशी नगरपंचायतीने सागीतले आहे.
*प्रतिक्रिया
खानापूर शहराला मलप्रभा नदीच्या पाण्यात विद्युत मोटारी बुडून बिघाड झाला. नदीपात्रातील पाणी कमी झाल्यानंतर विद्युत मोटारी दुरूस्त करून घेतल्या आता शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल.
– मजहर खानापूरी, नगराध्यक्ष, खानापूर
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …