Wednesday , March 4 2026
Breaking News

गर्लगुंजीत मराठी मुलांच्या शाळेची दुसरी वर्गखोली जमिनदोस्त

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या इमारतीची वर्ग खोली एप्रिलमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने जमिनदोस्त झाली. पाठोपाठ शुक्रवारी रात्री पुन्हा एक वर्गखोली कौलारू छतासह जोरदार पावसामुळे जमिनदोस्त झाली तर अजून दोन खोल्या पडण्याच्या मार्गावर आहेत.
गेल्या दहा वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या कौलारू वर्गखोलीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने नुकताच झालेल्या पावसामुळे छतासह इमारत जमिनदोस्त झाली. रात्रीच्यावेळी घटना घडली त्यामुळे यात जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच शाळा मुख्याध्यापिका सौ. एन. जी. देसाई, एसडीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य सर्वांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व संबंधित खात्याला घटनेची माहिती दिली.
गर्लगुंजी मराठी मुलांच्या शाळेत १५१ विद्यार्थी शिक्षण घेतात तर सहा शिक्षक कार्यरत आहेत.
निकृष्ठ दर्जाचे बांधकाम केल्याने वर्गखोली जमिनदोस्त झाली याला जबाबदार कोण असा सवाल गर्लगुंजी गावच्या शिक्षण प्रेमीतून होत आहे.
तेव्हा संबंधित खात्याने गर्लगुंजी मराठी मुलांच्या शाळेसाठी वर्गखोल्याची त्वरीत मंजुरी मिळवून नविन इमारत उभी करावी, अशी मागणी केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *