खानापूर : वडिलांच्या वाढदिवसा दिवशीच मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी खानापूर तालुक्यातील हलकर्णी येथे घडली.
याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील हलकर्णी येथील
आंबेडकर गल्लीतील प्रथमेश राजू कोळी (17) याने आपल्या वडिलांकडे नवीन मोबाईलची मागणी केली. पण वडिलांनी नवीन मोबाईल लवकरच घेऊ सध्या जुना वापर असे सांगितल्यामुळे रागाच्या भरात प्रथमेशने मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्रथमेश हा मराठा मंडळ पदवीपूर्व महाविद्यालयाचा विद्यार्थी होता.
प्रथमेशचे वडिल हे लोकसेवा सोसायटीत पिग्मी कलेक्टर म्हणून काम करतात आज ते आपला वाढदिवस साजरा करत होते, त्याचवेळी फोन न लागल्याने नैराश्येतून प्रथमेशने गळफास लावून घेतला.
यावेळी राजू कोळी हे ड्युटीवर गेले असता त्यांची पत्नी शेतात कामाला गेली होती. जेवणासाठी आलेल्या राजू कोळी यांना आपल्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पाहून धक्काच बसला.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta