कस्तुरीरंगन अहवालाला विरोध करणार : प्रमोद कोचेरी
खानापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्यासह खानापूर तालुक्यातील जवळपास 62 गावाचा कस्तुरीरंगन अहवालात समावेश केला आहे. याला विरोध करत येत्या 60 दिवसात तालुक्यातील 62 गावाचा संपर्क घेऊन, नागरिकांशी चर्चा करून नागरिकांसह खानापूर तालुका भाजपच्यावतीने केंद्र सरकारला हरकती देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी खानापूर येथील विश्रामधामात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, तालुक्याच्या आमदार निवडणुक डोळ्यासमोर ठेवून हजारो विद्यार्थ्यांना बॅग वाटण्याचा डाव करत आहेत. एकीकडे खासदार अनंतकुमार हेगडेनी तालुक्यात कोट्यानी निधी आणला. मात्र तालुक्याच्या आमदार वेळोवेळी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. कारण केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे हे विसरून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल म्हणाले की, कस्तुरीरंगन अहवाल हा खानापूर तालुक्यातील 62 गावावरील नागरिकांवर टांगती तलवार आहे. कस्तुरीरंगन अहवाल स्वीकारत केंद्र सरकारने 2013 मध्ये याबाबत अधिसुचना मसुदा जारी केला. यासाठी नागरिकांच्या सूचना, हरकती घेण्यासाठी व विविध कारणास्तव पडून होता. तेव्हा येत्या 60 दिवसात यावर तोडगा काढण्यासाठी खानापूर तालुक्यातील जनतेने एकवटले पाहिजे व या कस्तुरीरंगन अहवालाला कडाडून विरोध करण्यासाठी भाजपाच्या पाठीशी तालुक्यातील जनतेने उभे राहिले पाहिजे असे सांगितले.
भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, कस्तुरीरंगन अहवालाने खानापूर तालुक्यातील 62 गााववर अनेक निर्बंध येणार आहेत. त्यामुळे या 62 गावातील जनतेला जगणे मुष्कील होणार. याभागात उद्योग, वृक्षतोडीवर निर्बंध लादले जाणार, खाणकाम, उत्खनन आणि वाळू उपसावक पूर्ण बंदी राहणार, नवीन औष्णिक उर्जा प्रकल्प नाही, लाल श्रेणीतील उद्योगावर निर्बंध, तसेच अस्तित्वात असलेल्या उद्योगाच्या विस्तारावर मर्यादा असे अनेक निर्बंध लादले जाणार आहेत. यासाठी खानापूर तालुक्यातील 62 गावाच्या नागरिकांसाठी खानापूर तालुका भाजप सदैव पाठीशी राहून न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
यावेळी माजी जिल्हा पंचायत बाबुराव देसाई, धनश्री सरदेसाई आदीनी विचार व्यक्त केले.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमाणी, भाजप युवा नेते पंडित ओगले, सुरेश देसाई, राजेंद्र रायका, सचिव गुंडू तोपिनकट्टी, संजय कंची, प्रकाश निलजकर, पांडुरंग होसुरकर, राजू जांबोटकर, जांबोटी ग्राम पंचायत अध्यक्ष महेश गुरव, श्रीमती वासंती बडगेर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रास्ताविक संजय कंची यांनी केले. तर आभार राजेंद्र रायका यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta