खानापूर (वार्ता) : पारवाड – खानापूर वस्ती बस गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाच्या महामारीमुळे बंद करण्यात आल्यामुळे जांबोटी-कणकुंबी भागातील प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी वर्गांचे हाल होत आहेत. सदर बस त्वरित पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे. खानापूर आगारातुन गेल्या अनेक वर्षापासून पारवाड -खानापूर अशी वस्ती बस सुरू करण्यात आल्यामुळे जांबोटी कणकुंबी भागातील असंख्य प्रवासी तसेच खानापूर येथे शिक्षणासाठी येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची चांगली सोय होत होती. सकाळी साडेसहा वाजता पारवाडहून खानापूरला येत असल्यामुळे खानापूर तसेच अन्य ठिकाणी नोकरी-व्यवसायासाठी जाणारे नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचणे अनुकूल होत होते. मात्र गेल्या सहा महिन्यापासुन कोरोनाच्या महामारीमुळे बस सेवा बंद केली होती. गेल्या महिनाभरापासून खानापूर आगाराने बेळगावहून चिखले – चिगुळे वस्ती बस सुरळीत केली आहे. मात्र पारवाड-खानापूर ही वस्ती बस सुरू न केल्यामुळे प्रवासी व महाविद्यालयीन विद्यार्थी वर्गाची गैरसोय होत आहे. त्यासाठी बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी या भागातील नागरिकांची होत आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे शंकर पेठ जवळील पुल निकामी झाला होता त्यावेळेला जवळजवळ सहा ते सात महिने हि बस सेवा बंद करण्यात आली होती.
पारवाड, कुणकुंबी, जांबोटी भागातील लोकांनी
ही बाब तालुक्यातील राष्ट्रीय पक्षांच्या नेतेमंडळींच्या लक्षात आणून दिली. तेव्हा तालुक्यातील सर्व नेतेमंडळींनी भाजपाचे खानापूर अध्यक्ष संजय कुबल, सौ. धनश्री सरदेसाई जांबोटी कर, राजू रायका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, मधु कवळेकर, सुनिता दंडगल, यांनी स्वतः वारंवार डेपो मॅनेजरकडे ही बस सेवा पुन्हा सुरळीत करा, अशी मागणी केली होती. तर राज्याचे परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी हे खानापुर दौऱ्यावर आले असता या बस सेवेबद्दल तालुक्यातील भाजपाच्या नेतेमंडळी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तर लगेच कारवाई करून दुसऱ्या दिवशी बस सेवा सुरळीत चालू करून डेपो मॅनेजरला समज दिली होती. तसेच तालुक्याच्या लोकप्रिय आमदार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर व सर्वपक्षीयांनी पुढाकार घेऊन ही बस सेवा पूर्ववत सुरळी करून द्यावी. अशी मागणी पारवाड, कणकुंबी, जांबोटी, पश्चिम भागातील नागरिकांची मागणी होत आहे.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …