खानापूर (प्रतिनिधी) : रामगुरवाडी (ता. खानापूर) गावापासून ते खानापूर जांबोटी, महामार्गा पर्यंतच्या दोन किलो मिटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण वाहून गेले आणि रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणात चक्क शेडू दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण किती निकृष्ट दर्जाचे आहे हे दिसून येत आहे. अशा रस्त्यावरून रामगुरवाडी गावच्या नागरिकांना ये-जा करणे त्रासाचे होत आहे.
याची दखल घेऊन तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी पाहणी केली.
यावेळी संबंधित पीडब्लूडी खात्याच्या कंत्राटदार्याच्या निकृष्ट कामाबद्दल नाराजी व्यक्त करत त्या कंत्राटदाराचे लायसन्स रद्द करावी, अशी मागणी केली आहे.
रामगुरवाडीच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 30 लाख रूपयाचा निधी पाण्यात गेला असल्याचे सांगून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी केली.
यावेळी रामगुरवाडी गावचे नाणू शिंदे, मारूती माळवे, राजू मोटर, विठ्ठल शिंदे, पाडुरंग धबाले, रावजी पाखरे, गजानन धबाले, जनकापा मोटर, प्रशात शिंदे, उमेश मोटर, गजानन मोटर आदी नागरिक उपस्थित होते.
खानापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासात तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद पुढील मि.मी. मध्ये करण्यात आली आहे.
खानापूर: 37.5 मिली मिटर, नागरगाळी : 42 मिली मिटर, बिडी: 16.4 मिली मिटर, कक्केरी : 25.6 मिली मिटर, असोगा : 47.4 मिली मिटर, गुंजी : 50 मिली मिटर, लोंढा रेल्वे : 78 मिली मिटर, लोंढा पीडब्लूडी 76.4 मिली मिटर, जांबोटी : 86 मिली मिटर, तर तालुक्यात सर्वात जास्त पाऊस कणकुंबी येथे 150.6 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे.