खानापूर (प्रतिनिधी) : ईदलहोंड (ता. खानापूर) येथील
सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक अशोक रामचंद्र पाटील हे 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे माजी आमदार श्री. दिगंबरराव यशवंतराव पाटील होते.
यावेळी व्यासपीठावर एसडीएमसी अध्यक्ष तानाजी पाखरे, उपाध्यक्षा दीपा यशवंत पाटील, सर्व सदस्य सदस्या, प्रतिष्ठित नागरिक, गावकरी, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी गावकरी एसडीएमसी कमिटी, शिक्षक वृंद, विद्यार्थी व ईदलहोंड केंद्रातील मुख्याध्यापक यांच्यामार्फत त्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना तालुक्याचे माजी आमदार दिगंबरराव यशवंतराव पाटील म्हणाले की, अशोक रामचंद्र पाटील हे एक प्रयोगशील शिक्षक होते. खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागात त्यांनी सेवा बजावून शाळांची शैक्षणिक व भौतिक सुधारणा घडवून आणली आहे.
याप्रसंगी सर्व एसडीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्षा, सदस्य सदस्या ईदलहोंड केंद्रातील मुख्याध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अरुण पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती व्ही. एम. अनगोळकर यांनी केले.