खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक बैठक रविवार दि. 17 रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्यासह खानापूर तालुक्यातील 60 गावांचा समावेश कस्तुरीरंगन अहवालात समावेश केला आहे. यापूर्वी देखील महाराष्ट्र एकीकरण समितीने कस्तुरीरंगन अहवालाला विरोध केला होता. मात्र केंद्र सरकारने हा विरोध न जुमानता तालुक्यातील 60 गावांचा समावेश या अहवालात केला आहे. 60 दिवसांच्या आत सरकार दरबारी हरकत नोंदवायची आहे. कायदेशीर बाजू मांडण्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी तसेच सोमवार दि. 18 रोजी खानापूर -रामनगर रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे याचीही चर्चा बैठकीत होणार आहे. तरी खानापूर तालुक्यातील जनतेने उद्याच्या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta