खानापूर – रामनगर रस्त्यासाठी रुमेवाडी क्रॉस येथे उद्या रास्तारोको करण्याचा निर्धार
खानापूर : रविवार दिनांक 17-7-2022 रोजी दुपारी 12 वाजता खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शिवस्मारक खानापूर येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी तालुक्याचे माजी आमदार दिगंबरराव पाटील होते. यावेळी 6 जुलै 2022 रोजी कस्तुरीरंगन आयोगाने खानापूर तालुक्यातील 60 गावे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट केलेली आहेत, त्याबाबत चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकार्यांच्या गाठीभेटी घेऊन कस्तुरीरंगन आयोगाच्या शिफारशींची माहिती घेऊन संबंधित गावावर त्याचा काय परिणाम होणार याची शहानिशा करण्यासाठी अभ्यासू व्यक्तीची गाठभेट घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले. तसेच सोमवार दिनांक 18 जुलै 2022 रोजी जाहीर केल्याप्रमाणे खानापूर – रामनगर रस्त्यासाठी रुमेवाडी क्रॉस येथे रास्ता रोको करून असलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून शासनाला जाग आणण्याचे ठरविण्यात आले. या संबंधित रूमेवाडी क्रॉस, करंबळ पंचायत, शिंदोळी पंचायत, गुंजी पंचायत, कापोली पंचायत, मोहिशेत पंचायत व तालुक्यातील अनेक खेड्यांना रास्तारोको आंदोलनासाठी पत्रकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी तालुक्याचे माजी आमदार दिगंबरराव पाटील, आबासाहेब दळवी, नारायण लाड, नारायण कापोलकर, विठ्ठल गुरव, अॅड. आर. जे. अंद्रादे, मर्याप्पा पाटील, अमृत पाटील, शिवाजी पाटील, तानाजी कदम, मुरलीधर पाटील, रमेश देसाई, डी. एम. भोसले, प्रदीप पाटील, कृष्णा मन्नोळकर, विवेक गिरी, मनोहर पाटील, बी. बी. पाटील, प्रल्हाद मादार, ईश्वर बोबाटे व इतर समिती कार्यकर्ते पत्रक वाटप करण्यासाठी उपस्थित होते. तरी तालुक्यातील समस्त समितीप्रेमी, आजीमाजी लोकप्रतिनिधींनी या रास्तारोकोसाठी रुमेवाडी क्रॉस खानापूर येथे सोमवारी सकाळी 11 वाजता बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी केले.
Check Also
खानापूर – पारीश्वाड मार्गावर दुचाकी – बसचा अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार
Spread the love खानापूर : खानापूर – पारीश्वाड मार्गावर दोड्डहोसुर गावानजीक दुचाकी आणि बसचा समोरासमोर …