खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बैलूर व उचवडे ग्रामस्थांनी बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव केएसआरटीसी विभागाचे अधिकारी नायक यांची भेट घेऊन बैलूर व्हाया उचवडे अशी बस सेवा बेळगाव आगारातून सकाळी ८ वाजता व दुपारी ११ वाजता. आणि सायंकाळी ५ वाजता सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, बैलूर व उचवडे भागातून नागरिक मोठ्या संख्येने दररोज कामानिमित्त बेळगावला ये-जा करत असतात आणि या भागातून महाविद्यालयाना जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे त्यांना सकाळी जाताना गोल्याळी ही एकमेव बस असून या बसला प्रवासी अधिक असतात यामुळे बसमध्ये चढणे उतरणे फार कठीण होत आहे व ही बस अपुरी पडत आहे. यामुळे बेळगाव आगारातून बैलूर व्हाया उचवडे अशी बससेवा करावी, अशी मागणी केली.
यावेळी बेळगाव डेपोचे अधिकारी नायक यांनी निवेदनाचा स्विकार करून बैलूर व्हाया उचवडे अशी बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी जिल्हा पंचायत लक्ष्मण बामणे, लक्ष्मण झांजरे, श्री. नाकाडी, बैलूर व उचवडे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta