Tuesday , March 3 2026
Breaking News

खानापूर येथील पडळवाडीजवळ बस नाल्यात पडली

Spread the love

 

खानापूर : खानापूरहून कुंभर्डाकडे जाणारी केएसआरटीसी बस पडळवाडी वळणावर झाडापासून बचाव करण्यासाठी गेली असता नाल्यात पडल्याची घटना काल सायंकाळी घडली.
या रस्त्याच्या वळणावर एक झाड येते. या झाडाला धडकू नये म्हणून केएसआरटीसी बस चालकाने बस नाल्यात खाली उतरवली. सुदैवाने बसमधील कोणीही जखमी झाले नाही. नंतर सर्व प्रवासी इतर व्यवस्था करून घरी परतले. आज सकाळी क्रेनच्या सहाय्याने बस उचलण्यात आली.
अशा घटना वारंवार घडत असून, अशी दुर्घटना घडल्यास बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *