खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात सतत होणार्या मुसळधार पावसामुळे निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील मळव (ता. खानापूर) येथील गरीब शेतकरी कुटुंबातील सरस्वती बुध्दापा गावडे यांच्या घराच्या भिंती सोमवारी रात्री कोसळून लाखो रूपयाचे नुकसान झाले. त्यात त्याची संसार उपयोगी भांडी, कपाटे, कपडे, धान्य, पैसा, दागदागिने जमिनीत गाढले गेले.
या घटनेची माहिती मिळताच निलावडे ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष व तालुका ग्राम पंचायत संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी नुकताच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
संबंधित दुर्घटनेत कोसळून नुकसान झालेल्या महिलेल्या सरकारकडून आर्थिक मदत करण्यासाठी निलावडे ग्राम पंचायतीच्या पीडीओ अधिकार्यांना सुचना करून लवकरत लवकर मदत व्हावी. तसेच संबंधित खात्याच्या अधिकार्यांची भेट घेऊन त्याना जास्तीत जास्त मदत व्हावी, अशी मागणी केली आहे.
यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासनही त्या कुटुंबाला दिले.