खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याच्या दुर्गम भागात 75 वर्षानंतरही गावोगावी रेशन वाटप केले जात नव्हते. ही भाजप नेत्या व भाजप महिला मोर्चा व्हाईस प्रेसिडेंट डॉ. सोनाली सरनोबत यांच्या खानापूर येथील तक्रार निवारण कार्यालयात दुर्गम भागातील 23 गावांनी तक्रार नोंदविली. याची दखल घेऊन जुलै महिन्यापासून गावोगावी रेशन वाटप झाल्याची माहिती बुधवारी खानापूर येथील तक्रार निवारण कार्यालयात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, गेली 75 वर्षे तालुक्याच्या दुर्गम भागातील हणबरवाडा, धुदवाळ, मिराशीवाटरे, जोमतळे, वरकड, गवळीवाडा, मेंडील, पाली, देगाव, तळेवाडी, मांजरपै, आमगाव, चिंचवाड, देवळी, पिंपळे, घार्ली, माचीळी, सातनाळी, करीकट्टी, आदी गावात रेशन वाटप होत नव्हते. यासाठी जंगलातून चालत जाऊन दुसर्या गावातून रेशन घेऊन यावे लागत असे. याची तक्रार भाजप महिला मोर्चा व्हाईस प्रेसिडेंट डॉ. सोनाली सरनोबत यांच्या तक्रार कार्यालयात येताच याची दखल डॉ. सोनाली सरनोबत यांनी घेतली. व लागलीच मंत्री उमेश कत्ती यांच्या मदतीने गावोगावी रेशन वाटप जुलै महिन्यापासून चालू झाले आणि दुर्गम भागातील जनतेचे हाल संपले. याबद्दल मी खूप समाधानी झाले. अशाच तक्रारी आमच्या कार्यालयात आणून द्या. त्या आम्ही सोडवू असे आवाहन पत्रकार परिषदेत केले.