खानापूर (प्रतिनिधी) : मुळचे गर्लगुंजी (ता. खानापूर) गावचे सुपुत्र व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले माजी सैनिक अजित कल्लापा पाटील यांची पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या माजी सैनिक आघाडी अध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्रक पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार जगदीश तुकाराम मुळीक यानी देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. गर्लगुंजीच्या अजित पाटलांची भारतीय जनता पार्टीच्या माजी सैनिक आघाडी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गर्लगुंजी परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta