
खानापूर : बिडी ता. खानापूर येथील नेहरू मेमोरियल संयुक्त महाविद्यालयत इयत्ता दहावीच्या आणि बारावी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच इयत्ता अकरावी, नववी व आठवीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करून, आई-वडीलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून तसेच मोबाईलचा कमीत वापर करावा, नवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या युगात फक्त मोबाईलच्या आहारी न जाता त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे ते शिकून घ्यावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां हा खूप कष्टाळू, होतकरू आहे मात्र परीस्थिती आडवी येते अशी खंत डॉ. सोनाली सरनोबत यांनी प्रमूख पाहणे म्हणून बोलताना व्यक्त केली.
श्री. महेश बिडीकर चेअरमन जी.ई. सोसायटी बिडी हे अध्यक्षस्थानी होते, कार्यक्रमात इयत्ता बारावी आणि दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष बहूमान देऊन डॉ. सरनोबत व इतर पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. इयत्ता आठवी, नववी आणि अकरावीला नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत इयत्ता दहावीच्या व बारावीच्या विद्यार्थ्यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनींच्या ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली, प्राचार्य एल.पी. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत केले. अनेक विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला जी.ई. सोसायटीचे कार्यदर्शी गणू कुलकर्णी, ज्येष्ठ संचालक डॉ. बी.सी. पुजेर, एम.एम. दफेदार, राजन्ना तिम्मोली, मुख्याध्यापक डॉ. व्ही.सी. सिंदगी, काॅलेजचे प्राध्यापकवर्ग, शिक्षकवृंद व माजी विद्यार्थी जोतिबा भेंडेगीरी, गावातील ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री. व्ही. डी. पुजेर यांनी केले तर आभार प्रा. महादेव मर्यापगोळ यांनी मांडले.
Belgaum Varta Belgaum Varta