खानापूर (प्रतिनिधी) : निट्टूर (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेची इमारत तसेच श्री स्वामी विवेकानंद व्यायाम शाळेची खोली नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे जमिनदोस्त झाल्या. त्यामुळे मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना तसेच श्री स्वामी विवेकानंद व्यायाम शाळेच्या व्यायामपट्टूची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
तेव्हा तहसीलदारांनी पाहणी करून समस्या दुर करावी, अशा मागणीचे निवेदन श्री स्वामी विवेकानंद व्यायामपट्टू व निट्टूर गावच्या नागरिकांनी उपतहसीलदार के. एम. कोलकार यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, निट्टूर प्राथमिक मराठी शाळेची इमारत तसेच श्री स्वामी विवेकानंद व्यायाम शाळेची खोली मुसळधार पावसाने कोसळून जमिनदोस्त झाली. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना तसेच व्यायामपट्टूच्या समोर समस्या निर्माण झाली आहे.
तेव्हा लवकरात लवकर इमारत उभा करून आमची गैरसोय दुर करावी, अशी मागणी केली आहे.
निवेदन सादर करताना व्यायाम शाळेचे मयूर देसाई, नागेश मादार, उत्तम गणेबैलकर तसेच गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपतहसीलदार के. एम. कोलकार यांनी निवेदनाचा स्विकार करून समस्या सोडवून देण्याचे आश्वासन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta