Saturday , October 19 2024
Breaking News

खानापूर तालुक्यातील १०६ गावाना देगांव बहुग्राम योजनेचा होणार लाभ

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : केंद्र व राज्य सरकारच्यावतीने शाश्वत पाणी योजनांचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे खेडोपाडी जनतेला शुध्द पिण्याचे पाणी मिळण्यासाठी कित्तुर व खानापूर तालुक्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत देगांव बहुग्राम पाणी योजनेसाठी ५६५ कोटी रुपये अनुदान मंजुरीचा निर्णय कॅबिनेट बैठकीत झाल्याने खानापूर तालुक्यातील १०६ गावाचा या योजनेत समाविष्ट केल्याने घर तेथे नळपाणी योजनेचे स्वप्न भाजप सरकारमुळे साकार होणार, अशी माहिती भजप नेते माजी आमदार अरविंद पाटील यांनी खानापूर पीडब्लूडी विश्रामात बोलविलेल्या बैठकीत दिली.
प्रारंभी राजेंद्र रायका प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी माजी आमदार अरविंद पाटील यांनी मुख्यमंत्री बसवराज बोमाई, मंत्री लक्ष्मण सवदी, सी. सी. पाटील व आमदार महांतेश दोडगौडर यांचे अभिनंदन करून ते म्हणाले की, खानापूरच्या मलप्रभा नदीच्या पाण्याचा उपयोग बाहेर तालुक्याला होत होता. खानापूर तालुक्यातील जनतेचाही हक्क आहे. म्हणून देगांव बहुग्राम पाणी योजनेचा लाभ तालुक्यातील १०६ गावाना होणार आहे, असे सांगितले. यात आमदाराचे श्रेय नसल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना कोचेरी म्हणाले की, जलजीवन मिशनचे कार्य केंद्र व राज्य भाजप सरकारने आपल्या निधीतून राबविले असून केंद्र व राज्य सरकारचे ४५ टक्के व लाभार्थीकडुन ५ टक्के तसेच स्थानिक ग्राम पंचायतीमधून ५ टक्के निधी उपलब्ध करण्यात आला आहे, असे सांगितले. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष संजय कुबल यांनी भाजप सरकारकडून खानापूर तालुक्यासाठी भरपूर निधी दिला आहे. मात्र श्रेय घेणारे वेगळेच आहेत, असे सांगितले. बैठकीला भाजप नेते व माजी आमदार अरविंद पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, ऍड. चेतन मणेरीकर, भाजप युवा नेते पंडित ओगले, राजेद्र रायका, किरण तुडयेकर आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. आभार पंडित ओगले यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर येथे उद्यापासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

Spread the love  बेळगाव : तोपीनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रांगणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *